दिनांक २३ ऑगस्ट २०२३ बुधवार संध्याकाळी ठरल्याप्रमाणे ठीक ६ वाजून ४ मिनिटांनी चांद्रयान ३चंद्रावर उतरले. बालभवनच्या हॉल मध्ये सर्वांसाठी मोठ्या पडद्यावर थेट प्रक्षेपण दाखविण्याची सोय केली होती आणि जमलेल्या सर्व मुलं,पालक,ताई,रिक्षा काका सगळ्यांनी एकच जल्लोष केला.आनंदानी टाळ्या वाजवल्या आणि आनंद व्यक्त केला.
गरवारे बालभवनचे ट्रस्ट प्रतिनिधी डॉ.श्रीधर राजपाठक यांच्या उपस्थितीत मुलांनी बालभवनच्या मैदानावर फुगे सोडून हे यश साजरे केले आणि ही मोहीम फत्ते करणाऱ्या सर्व शात्रज्ञ,वैज्ञानिक ,सहभागी तज्ञ मंडळीचे कौतुक करून आभार मानले.
ही मोहीम फत्ते होण्यापूर्वी डॉ. विदुला म्हैसकर यांचे मार्गदर्शन आणि ताईंचा मदतीने फुग्याच्या साहाय्याने बालभवनचे एक प्रातिनिधिक यान खिडकीत लावलेल्या चंद्राच्या चित्राकडे सोडून मुलांनी आनंद व्यक्त केला.
शेवटी डॉ राजपाठक यांनी आणलेली काजुकतली सर्वांना दिली.
दिनांक १५ ते २९ जुलै २०२३ रोजी बालभवनचे ७७ वे कार्यकर्ता प्रशिक्षण झाले. प्रशिक्षणात एकूण २९ पैकी २७ ताई आणि २ दादा सहभागी झाले होते. त्यापैकी ८ जण बदलापूर येथून तर इतर पुणे आणि जवळपासच्या भागातील होते.
बदलापूर येथे नव्याने बालभवन सुरू करण्यासाठी कार्यकर्ते आले होते. चाकण, खेड भागात मुलांसाठी काम करणाऱ्या उर्मी संस्थेकडून ४, खेड शिवापूर येथील मुदीता ट्रस्ट कडून १, RSVK संस्थेकडून १, पाळणाघरात काम करणाऱ्या १ व इतर शिक्षक, पालक असे आले होते.
डॉ भूषण शुक्ल,समीर शिपुरकर, मुक्ता चैतन्य, वर्षा सहस्त्रबुध्दे, डॉ प्रमोद पाटील, स्वाती उपाध्ये, आभा भागवत, मोहन उपाध्ये, डॉ विदुला म्हैसकर, स्मिता पाटील, मोहन उपाध्ये असे पुण्यात मुलांच्या क्षेत्रात काम करणारे नामवंत वक्ते आले होते.
विशेष गरजा असणाऱ्या मुलांना बालभवनच्या उपक्रमात सामावून घेणे, digital माध्यम शिक्षण, आपलं - मुलांचं आणि भाषेचं नातं, मुलांसाठी नाटक - गाणी, posture - pain @ ergonomics, विज्ञान शिक्षण, मुलांसाठी चित्र अशा अनेक विविध विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केलं.
शिवाय खेळ, गोष्टी, चित्रकला, हस्तकला, ओरिगामी, गाणी, विज्ञान खेळणी या गोष्टी प्रत्यक्ष हाताने करण्याचा अनुभव बालभवनच्या ताईंनी प्रशिक्षणार्थींना दिला.
त्यांनी मूल्यमापनात प्रशिक्षण विषयी अगदी भरभरून लिहिलं आहे. त्यांना याचा उपयोग थेट त्यांच्या कामात करता येणार आहे याचे समाधान आहे. वक्ते, विषय, हाताने केलेले काम, बालभवनचे वातावरण, बालभवनच्या ताई याबद्दल त्यांनी विशेष कौतुक करून इथून बाहेर पडताना खूप ठेवा घेऊन सगळे परत गेले.
दिनांक २० फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी २०२३ या काळात बालभवनचे ७६ वे प्रशिक्षण पार पडले. यात एकूण २२ प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. बदलापूर, ठाणे, नसरापूर, हडपसर आणि पुणे परिसरातील इतर असा छोटा छान गट होता. वेगवेगळ्या संस्थांकडून ३/४ जणी एकत्र प्रशिक्षण घ्यायला आल्या होत्या हे यावेळचे वैशिष्ट्य होते. बदलापूर येथून नव्याने बालभवन सुरू केलेल्या संस्थेकडून ४ जणी, कोथरूडच्या यलो लीली किड्स शाळेकडून ३ जणी, ठाणे आणि हडपसर येथे नवीन बालभवन सुरू करण्यासाठी एक/एक जण तर नसरापूर येथील मुदिता ट्रस्ट कडून एक अशा विविध स्तरातील लोकांनी प्रशिक्षण घेतले.
नेहमप्रमाणे उत्तम वक्ते यासाठी लाभले. सध्याचा ज्वलंत विषय स्क्रीन आणि मुलं यावर बोलायला मुक्तांगणच्या डॉ. मुक्ता पुणतांबेकर, करोना पश्चात मुलांच्या वाढलेल्या वर्तन समस्या आणि त्यांच्या आयुष्यातील वाढलेले खेळाचे महत्त्व यावरचे अतिशय महत्वाचे, उपयुक्त, थेट कामाशी संबंध असणारे डॉ सुनील गोडबोले यांचे विचार ऐकायला मिळाले. वाई येथील द्रविड हायस्कूलचे मुख्याध्यापक आणि गणित तज्ज्ञ श्री. नागेश मोने यांनी तर अतिशय सोप्या भाषेत छोटी छोटी उदाहरणे सांगून मुलांबरोबर काम करण्याचे तत्वज्ञानच सांगितले. चौकटीबाहेर जाऊन शिकण्याची वृत्ती जोपासणे, हाताने काम करण्याच्या शिक्षणाचे महत्व, मुलांना स्वतः चे शरीर, मन आणि सोल याची जबाबदारी घ्यायला शिकवणं असे अनेक महत्वाचे मुद्दे डॉ विदुला म्हैसकर याच्या व्याख्यानातून मिळाले. मुलांबरोबर करायचे अगदी वेगळे चित्रांचे प्रयोग हे आभा भागवत यांच्याकडून तर गोष्टीतून संवाद त्यातून मुलांच्या व्यक्तीमत्वात होणारा बदल त्यासाठी आपण मोठ्यांनी शिकण्याच्या गोष्टी असे परिपूर्ण व्याख्यान श्रीमती स्वाती उपाध्ये यांचे ऐकायला मिळाले.
याखेरीज प्रशिक्षणामधील महत्वाचा भाग म्हणजे हाताने करायच्या हस्तकला, चित्रकला, विज्ञान खेळणी, ओरिगामी अशा गोष्टी बालभवनच्या ताईंनी घेतल्या. तसेच खेळ, गाणी, गोष्टी हे सुध्दा नव्याने शिकायला मिळाले.
याचबरोबर मूल्यमापन सत्रात बालभावनाच्या वातावरणाबद्दल प्रशिक्षणार्थींनी भरभरून सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या. तसेच या प्रशिक्षणातून नवीन शिकायला - ऐकायला मिळाले व त्याचा पुढील कामात नक्कीच उपयोग होईल असा अभिप्राय सर्व प्रशिक्षणार्थींनी दिला.
गरवारे बालभवनला 15 मार्च रोजी टिळक स्मारक मंदिर येथे शिवाजी कुल संस्था, स्काऊट ग्राउंड, सदाशिव पेठ, पुणे यांच्यातर्फे 'बाल कार्य सन्मान' पुरस्कार श्री. शेखर मुंदडा, आणि ब्रिगेडियर श्री. सुनील लिमये यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शिवाजी कुल संस्था, स्काऊट ग्राउंड, सदाशिव पेठ, पुणे ही 105 वर्षे जुनी संस्था आहे. यापूर्वी हा पुरस्कार महाराष्ट्र मंडळ आणि स्वरूपवर्धिनी या संस्थांना देण्यात आला आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा
दिनांक 26 जुलै ते 30 जुलै 2021 या काळात गरवारे बालभवनचे 73 वे प्रशिक्षण झाले.
यासाठी जळगाव, लातूर, अहमदनगर, चिपळूण आणि पुणे अशा महाराष्ट्रभरातून निरनिराळ्या ठिकाणाहून 43 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. विशेष म्हणजे अहमदनगर येथील स्नेहालय संस्थेचे 6 कार्यकर्ते आले होते. नुकत्याच चिपळूण येथे पुराने थैमान घातले असतानाही त्यातून सावरून तेथील एक डॉक्टर आणि त्यांच्या मैत्रीणही सहभागी झाल्या होत्या. विशेष म्हणजे यावेळी 5 दादा (पुरुष ) आले होते.
आतापर्यंतच्या प्रशिक्षणातून' मुलं समजून घेऊया ' अशा भूमिकेतून त्याचे डिझाईन केलेले होते. या प्रशिक्षणात मात्र कोव्हिड परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुलं घरात असणं, शाळा - मित्र - खेळणं अशा अनेक गोष्टींपासून दूर रहाणं या गोष्टींचा विचार करून प्रशिक्षणाची tagline 'मुलांच्या वाढीत सहभाग आपला' अशी होती. मुलं घरी असल्याने, आहे त्या परिस्थितीत त्यांचा आनंद टिकून रहावा, त्यांचं कुतूहल टिकून रहावं, त्यांच्या नैसर्गिक उर्मी जपल्या जाव्यात, त्यांना प्रयोग करण्याची संधी मिळावी अशा हेतूंनी प्रशिक्षणाचे डिझाईन करण्यात आले होते.
प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ सुनील गोडबोले, चित्रकार आभा भागवत, सामाजिक कार्यकर्त्या रेणू गावस्कर, शिक्षण तज्ञ - वर्षा सहस्त्रबुध्दे, शास्त्रज्ञ - प्रा. मिलिंद वाटवे अशा तज्ञ व्यक्तींनी मुलांच्या वाढीच्या दृष्टीने मोठ्यांची जबाबदारी यावर आपले विचार मांडले. मोठ्या प्रसिद्ध चित्रकारांची ओळख आणि त्यांची चित्रकला मुलांपर्यंत पोहोचविणे असो, मुलांच्या वेगळ्याच भावविश्वाशी जोडणं असो नाहीतर पालकत्वाचा खरा अर्थ असो. कोव्हिड सारख्या भयंकर परिस्थितीतून गेलेल्या मुलांच्या मनाचा विचार करून त्यांच्याबरोबरचा संवाद असो नाहीतर सर्वसमावेशक शिक्षण असो. अशा विविध विषयांवर तज्ञ बोलले आणि प्रशिक्षण एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. सध्याच्या परिस्थितीतून आपणही बाहेर पडून मुलांना समजून घेऊन नव्याने मुलांबरोबर काम करण्यासाठी एक नवीन ऊर्जा देऊन गेले.
या प्रशिक्षणाचा अजून एक महत्वाचा भाग म्हणजे हाताने प्रत्यक्ष करण्याच्या कृती. बालभवनच्या ताईंनी केलेले हस्तकला, ओरिगामी, विज्ञान प्रयोग, घरातल्या घरात खेळता येणारे खेळ, मुलं करू शकतील अशा सोप्या जादू, गोष्टी याचे 25 व्हिडिओज आणि गाण्यांचे ऑडिओ प्रशिक्षणार्थींना देण्यात आले. या प्रशिक्षणाच्या निमित्ताने चांगली वाचनीय पुस्तकं, फिल्म्स, YouTube links याबद्दल चर्चा आणि देवाणघेवाण झाली.
काही प्रशिक्षणार्थीच्या निवडक प्रतिक्रिया :-
१. अशा प्रकारच्या शिक्षणाची खूप गरज आहे. विषय आणि प्रशिक्षक खूप चांगले होते.
२. Very well organised, professional workshop. अशी नेहमी आयोजित करावी. आम्हाला यायला आवडेल.
३. मुलांना घडविताना स्वतः पण घडत असतो हे कळलं.
४. सगळ्या ताई खूप छान आहेत. ताईंशी अजून interaction आवडेल.
५. नवीन विषय सुचविले आहेत.
* Brain development of children.
* आजची शिक्षणपद्धती
* विभक्त कुटुंबपद्धती असताना मुलांशी कसं वागायचं ?
दि. २५ मे ते ३० मे २०२१ या दिवशी बालभवनचे ७२ वे कार्यकर्ता प्रशिक्षण झाले.
एकूण ६० प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. त्यात ५८ स्त्रिया तर २ पुरुष होते.
महाराष्ट्रभरातून निरनिराळया ठिकाणाहून लोक सहभागी झाले होते. पुण्यातील ३० जण तर इतर मुंबई, ठाणे, नागपूर, रत्नागिरी, कुडाळ, वेंगुर्ले, बदलापूर, लातूर, सावंतवाडी, सातारा, नाशिक, बंगलोर अशा निरनिराळ्या ठिकाणचे लोक होते.
तळेगावच्या कलापिनी संस्थेकडून, चिपळूणच्या आदिवासी शाळेचे शिक्षक तर पुण्यातील आयडेंडीटी फाउंडेशन तसेच आयसर मधूनही शिक्षक आले होते.
काही शिक्षक, काही पालक, काही प्रत्यक्ष काम करणारे, काही पाळणाघर, संस्कार केंद्र कार्यकर्त्या असा संमिश्र पण काम करू इच्छिणारा एक छान ग्रुप होता.
प्रशिक्षण करण्याचा हेतू :
१. बालभवन सुरु करण्याची इच्छा
२. सुजाण पालक होण्यासाठी
३. प्रत्यक्ष करत असलेल्या कामाला योग्य दिशा मिळावी.
४. नवीन शिकण्यासाठी, स्वतःची प्रगती होण्यासाठी, मूल समजून घेण्यासाठी
अशी ध्येय डोळ्यासमोर ठेवून प्रशिक्षण घेण्यात आले होते.
या प्रशिक्षणाचा कणा म्हणजे माननीय वक्ते आणि त्यांनी केलेले, महत्वपूर्ण विषयावरील मार्गदर्शन --
१. श्रीमती आभा भागवत - चित्रकला आणि आपण
२. डॉ. सुनील गोडबोले - तणावमुक्त पालकत्व
३. डॉ. श्रुती पानसे - मुलांच्या मेंदूत डोकावूया
४. सर्व विषयांना सामावून घेणारं शिक्षण - डॉ. विदुला म्हैसकर
५. सुसंवादी पालकत्व - श्रीमती स्वाती उपाध्ये
आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बालभवनचं काम उभं करणाऱ्या आणि या कामाकडे पहाण्याची दृष्टी देणाऱ्या बालभवनच्या संचालिका शोभा भागवत.
अशा नामवंत व्यक्तीचे अतिशय मोलाचे विचार आणि त्यामुळे या कामाचा आवाका प्रशिक्षणार्थींना लक्षात आला. या सर्व वक्त्यांकडून अतिशय चांगला संदेश घेऊन प्रशिक्षण संपले.
रोज संध्याकाळी हाताने प्रत्यक्ष करता येतील असे हस्तकला, चित्रकला, ओरिगामी, विज्ञान प्रयोग, खेळ याचे व्हिडिओ सर्वांना पाठवण्यात आले. चांगल्या गोष्टी, गाणी यांचे ऑडिओ दिले. वाचनीय पुस्तकांच्या PDF दिल्यामुळे पुस्तकं वाचायला मिळाली.
पहिल्याच दिवशी श्री. समीर शिपुरकर यांनी बालभवनवर बनविलेली, बालभवनचं तत्वज्ञान सांगणारी अशी सुंदर फिल्म पहायला मिळाली. प्रशिक्षण online असल्यामुळे प्रत्यक्ष बालभवनला जरी येता आले नाही तरी या फिल्ममुळे बालभवनची एक ओझरती झलक पहायला मिळाली. त्यामुळे बालभवनच्या वातावरणाचा थोडा अंदाज प्रशिकणार्थींना आला.
काही मोजक्या प्रतिक्रिया -
"खूप नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. या सगळ्याचा वस्तीतल्या मुलांबरोबर काम करताना उपयोग होईल. स्वतःचा दृष्टीकोन बदलणे गरजेचं आहे हे कळलं."
"गाणी, खेळ आणि सगळ्यातच नाविन्य होतं. तज्ञांचे मार्गदर्शन वैविध्यपूर्ण होते. या प्रशिक्षणाचा आमच्या बालभवनांना खूप फायदा होईल."
"माझ्याकडे येणाऱ्या मुलांना नवीन काय देता येईल याचा उलगडा झाला."
"मुलांना तर नवीन शिकवता येईलच पण स्वतःही नवीन शिकायला हवं हे कळलं."
"मूल झाल्यावर असलेला आनंद, उत्सुकता याची जागा भीती, काळजीने घेतली होती. ही भीती पळाली."
"व्याख्याते मनमोकळेपणे आणि भरभरून बोलले. हातचे न राखता share केले.
"बालभवन संकल्पना नवी असलेल्या गावी, नव्याने सुरु केलेले बालभवन वाढविता कसं येईल हे कळलं."
"शोभाताईंच्या विचारातून प्रेरणा घेऊन तुम्ही ताईंनी हा उपक्रम चालू ठेवून आम्हाला उपकृत केलेलं आहे.
"संयम ठेवणे, आत्मपरीक्षण करणे, चांगला माणूस म्हणून घडविणे हे कळलं.
"Pandemic परिस्थितीत positive साईड इफेक्ट देणार ठरलं.
"Presentation स्टाईल आवडली. अपेक्षेपेक्षा जास्त मिळालं.
"मूल घरात असणं आनंददायी असतं हे कळलं. मुलांमुळे घराला जीवंतपणा येतो हे कळलं.
"जास्तीत जास्त पालकांसाठी अशी सेशन्स उपलब्ध करा.
या channel वर आहेत चित्रकला, हस्तकला, ओरिगामी, विज्ञान खेळणी, गाणी, गोष्टी, घरी खेळता येतील असे मजेचे खेळ तसेच आहेत छान गोष्टी, अर्थपूर्ण कविता आणि संचालिका शोभा भागवत यांची प्रदीर्घ मुलाखत. या मुलाखतीत शोभाताईंनी काय विचार करून बालभवन सुरु केलं, ते कसं वाढवलं, कोणाच्या विचारांचा आधार घेतला, उपक्रम, खेळ याचं नाविन्य कसं जपलं याचा आढावा समीर शिप्पुरकर यांनी घेतला आहे. ही मुलाखत २१ भागांमध्ये आहे.
बालभवनमधे मुलांबरोबर ताई अनेक नाविन्यपूर्ण खेळ खेळतात, उपक्रम करतात, गाणी म्हणतात, गोष्टी सांगतात. Lock down च्या काळातही आमच्या ताईंनी त्यांच्या गटातील मुलांना पाठवण्यासाठी काही छोटे विडीओ तयार केले. तेही ह्या channel वर ठेवले आहेत.
तुम्ही जर हा channel subscribe केलात, तर जेंव्हा जेंव्हा आम्ही या चॅनेलवर एखाद्या नवीन विडीओची भर घालू , तेंव्हा तेंव्हा तुम्हाला त्याची सूचना मिळेल.
गरवारे बालभवनचा हा खजिना नक्की पहा, वापरा, अनुभवा आणि आपल्या प्रतिक्रिया आम्हाला email वर जरूर कळवा (info@garwarebalbhavanpune.org).
बालदिनानिमित्त गरवारे बालभवनात बालमेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याचे सविस्तर वृत्त इथे वाचा.
जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा आणि संपूर्ण लेख वाचा (PDF 2.44MB) >>>
Chinmay Rane, an ex-student of Balbhavan received 'Samajik Palakatva Puraskar 2013' (सामाजिक पालकत्व पुरस्कार 2013)
for his outstanding work with the children in Kibber School, Himachal Pradesh, Spiti Valley.
26-year-old Chinmay Rane is a wild life photographer and a film maker. While traveling in Spiti Valley he came across with the children in Kibber village. He started interacting with the local people. He started with small after-school activities. He started teaching computer science and eventually got associated with Kibber School.
He says that when he started working with children in Kibber, he remembered his days in Balbhavan. He tried to implement some of the things which he learnt in Balbhavan.
Balbhavan Family is very proud of Chinmay.
Read more about Chinmay
and his work on following links.
१४ नोव्हेंबर - बालदिन. या निमित्ताने गरवारे बालभवन पुणे येथे खास 'बालमेळाव्याचे' आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात पुण्याच्या परिसरातील १८ संस्थांचा सहभाग होता. हा बालमेळावा १३ नोव्हेंबर रोजी गरवारे बालभवनात सकाळी ९ ते २ या वेळात पार पडला.
मेळाव्याचे
उद्घाटन
स्वरदा
कोडोलिकर
या ९ वर्षांच्या मुलीच्या हस्ते झाले.
ही मुलगी अतिशय
चुणचुणीत, बोलकी,
हुषार असून अंध
आहे. स्वरदा सध्या बुद्धीबळ शिकत आहे. ती गरवारे बालभवनाची विद्यार्थिनी आहे. तिने खंजिरी वाजवून मेळाव्याचे उद्घाटन केले.
उदघाटनाच्या
कर्यक्रमात
बालरंजन केंद्रातील
मुलींनी नृत्य सादर
केले. त्यानंतर
मुलांनी कविवर्य
कुसुमाग्रजांच्या
'भारतवासी आम्ही सारे
भारतीय भाई...' आणि
'उठा उठा चिऊताई...'
या कविता सादर केल्या.
नंतर गरवारे
बालभवनाच्या
मुलांनी गुरुदेव
रविंद्रनाथ टागोर
यांची 'आज अमदेर छुटी'
ही कविता सादर केली.
त्यानंतर मुले
गटांनुसार रिले
रेसेस, काही गमतीचे
खेळ आणि इतर मैदानी
खेळ खेळली. मुलांनी
एका मोठ्या कापडावर
चित्रे देखील काढली.
१८ वेगवेगळ्या
संस्थांतून आलेली
२०० मुले यावेळी
एकत्र आली, ती एकत्र
खेळली, त्यांनी
एकत्र खाऊ खाल्ला.
अशाप्रकारे
बालभवनात
आनंदानी
बालदिन साजरा झाला.
खालील संस्था या
मेळाव्यात सहभागी
झाल्या होत्या-
१. गरवारे बालभवन
२. कास्प - राजगुरुनगर
३. बालरंजन केंद्र -
भारती निवास सोसायटी
४. आपलं घर - वारजे
५. किलबिल बालोद्यान -
सिंहगड रोड
६. सर्वेषां सेवासंघ -
धायरी
७. यशश्री बालभवन - पौड
रोड
८. खेळघर - कर्वे नगर
९. बालविकास केंद्र -
नवीन मराठी
१०. नीहार - लोहगाव
११. फोर्ब्ज मार्शल
बालभवन - कासारवाडी
१२. एकलव्य शिक्षण
न्यास - धायरी
१३. जनरेशन नेक्स्ट -
कर्वे नगर
१४. स्वाधार -
बिबवेवाडी
१५. आपलं बालभवन -
सिंहगड रोड
१६. इंडिया
स्पॉन्सरशिप कमिटी -
येरवडा
१७. ज्ञानदेवी -
शिवाजीनगर
१८. इंटरव्हिडा -
हडपसर
On 1st September 2009 Garware Balbhavan completed 24 years and has entered
the 25th year of its existence. On this occasion here are the thoughts
about Balbhavan penned by some of the old-timers at Balbhavan!
Click below to view/download the articles in PDF format